मुंबई – गो फर्स्टने ७ जून २०२३ पर्यंत सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. यापूर्वी कंपनीने ४ जूनपर्यंत उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आता हा कालावधी आणखी ३ दिवसांनी वाढवण्यात आला आहे. ऑपरेशनल कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय कंपनी लवादामध्ये ३ मे रोजी दिवाळखोर घोषित करण्यासाठी अर्ज केल्यानंतर कंपनीने सर्व उड्डाणे रद्द केली होती.
‘उड्डाणे रद्द केल्यामुळे प्रवाशांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. लवकरच फ्लाइट्स बुक करण्याची प्रक्रियाही कंपनी सुरू करणार आहे. एअरलाइन्स लवकरच सर्व प्रवाशांना त्यांचे पैसे परत करणार आहे.’ असे गो फर्स्टने ट्विटरवरुन सांगितले.
गो फर्स्टची उड्डाणे ७ जूनपर्यंत रद्द
