मुंबई
गो फर्स्ट या एअरलाइन्स कंपनीची सर्व उड्डाणे ३० मे पर्यंत रद्द करण्यात आली आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल कंपनीकडून दिलगीरी व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय कंपनीने प्रवाशांना त्यांचा परतावा लवकरात लवकर देण्याचे आश्वासन दिले आहे. गो फर्स्टने ही माहिती त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन दिली. काही ऑपरेशनल कारणांमुळे विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) गो फर्स्ट एअरलाइन्सकडे कार्यरत असणाऱ्या त्यांच्या सर्व विमानांची माहिती मागितली आहे. त्याचबरोबर त्यांच्या कर्मचाऱ्यांचीदेखील माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी गो फर्स्टने त्यांची ३० मे पर्यंतची सर्व विमाने रद्द करण्याची घोषणा केली आहे. ३ मेपासून गो फर्स्टची सगळी उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. ही उड्डाणे २७ तारखेपासून सुरू होणार होती. परंतु ही तारीख ३० मेपर्यंत वाढवण्यात आली आहे.
न