Home / News / गोहत्येवरून वसंत मोरे संतापले! स्वतःच गोठ्यावर हातोडा चालवला

गोहत्येवरून वसंत मोरे संतापले! स्वतःच गोठ्यावर हातोडा चालवला

पुणे- पुण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे हे गायीच्या हत्येच्या घटनेवरून आक्रमक झाले. मोरे यांनी स्वत: हातोडा हातात घेऊन...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

पुणे- पुण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे हे गायीच्या हत्येच्या घटनेवरून आक्रमक झाले. मोरे यांनी स्वत: हातोडा हातात घेऊन कात्रज भागात एका गोठ्यातील अनधिकृत बांधकाम तोडले.

कात्रजमधील मांगडेवाडी भागातील एका गोठ्यात काल गायीच्या हत्येची घटना घडली. या प्रकरणाची माहिती वसंत मोरे यांना मिळाली.त्यानंतर मोरे आणि त्यांचे काही कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी त्या गोठ्यावर हातोडा चालवला. तसेच या व्यक्तीच्या मागे आणखी कोण, कोण आहेत? त्याचा शोध घ्यावा, पोलिसांनी याप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी त्यांनी केली.त्यानंतर सोशल मीडियावर बोलताना वसंत मोरे म्हणाले की, या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत. गायीच्या हत्येची तक्रार पोलिसांकडे केली.त्यानंतर दोन-तीन जणांना अटक करण्यात आली आहे. गायीची हत्या करणारी व्यक्ती हिंदू धर्मातील असल्याचा दावा वसंत मोरे यांनी केला.

Web Title:
संबंधित बातम्या