Home / News / गोव्यात बनतेय १०० मीटर लांबीची हातमागावरील ‘कुणबी साडी’!

गोव्यात बनतेय १०० मीटर लांबीची हातमागावरील ‘कुणबी साडी’!

पणजी – सध्या सुरू असलेल्या अमेझिंग गोवा संमेलनामध्ये राय येथील ऊर्जा प्रशिक्षण आणि संशोधन अकादमीतर्फे एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

पणजी – सध्या सुरू असलेल्या अमेझिंग गोवा संमेलनामध्ये राय येथील ऊर्जा प्रशिक्षण आणि संशोधन अकादमीतर्फे एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे.या उपक्रमांतर्गत याठिकाणी आतापर्यंतची सर्वांत मोठी कुणबी साडी हातमागावर विणली जात आहे.ही साडी तब्बल १०० मीटर लांबीची असणार आहे.या साडीची ‘गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नवा विक्रम म्हणून नोंद केली जाणार आहे.
आतापर्यंतची हातमागावरील सर्वांत मोठी कुणबी साडी ही ४० मीटर लांबीची आहे.पण या संमेलनातील साडी ही १०० मीटर लांबीची आहे.सध्या या साडीचे ९७ टक्के काम पूर्ण झाले आहे.पुढील दोन दिवसांत ही १०० मीटर लांबीची साडी तयार होईल,असा विश्वास ऊर्जा प्रशिक्षण आणि संशोधन अकादमीच्या संचालिका डॉ. स्नेहा भागवत यांनी व्यक्त केला आहे.या अकादमीतर्फे कुणबी साड्या तसेच अन्य साहित्य बनविले जाते. डॉ. भागवत म्हणाल्या की,काही दिवसांपूर्वी व्हाइब्रन्ट् गोवातर्फे आम्हाला सर्वांत मोठी कुणबी साडी करण्याबाबत विचारणा झाली होती.उपक्रम चांगला असल्याने आम्ही त्यास होकार दिला. सध्या ही साडी विणण्याचे काम अकादमीतील कलाकार आणि फॅशन डिझाईनचे विद्यार्थी करत आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या