गोव्यातील वेर्णा -लोटली मार्गावर कोसळली दरड

मडगाव – दक्षिण गोव्यातील वेर्णा – लोटली या महामार्गावर मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याची घटना घडली आहे.वाहनांची वाहतूक सुरू असतांना डोंगराचा काही भाग कोसळून मार्गावर आला.मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मागील बारा दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस कोसळत असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.त्यातच ही दरड कोसळल्याची घटना घडली आहे.वेर्णा अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याला सुरुवात केली.दरड कोसळल्याने आज दुहेरी मार्गावरील एक मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. वास्कोला जाणाऱ्या अवजड आणि माल वाहू वाहने याच मार्गावरून जात असतात. तसेच वेर्णा औद्योगिक वसाहतीत कामाला जाणारे चाकरमानी या रस्त्याचा जास्त वापर करतात.दरडीबरोबर मोठे दगडही कोसळून खाली आले आहेत.पाऊस असाच सुरू राहील्यास धोकादायक अवस्थेत असलेल्या डोंगराचा भाग पुन्हा कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top