पणजी – उत्तर गोवा जिल्ह्यातील तिसवाडी तालुक्यात असलेले एकमेव भाटी मिठागर नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. हे मीठागर हा व्यवसाय परवडत नसल्याने बंद पडत चालले आहे. सरकारने आगर व्यावसायिकांना मदत केल्यास,मीठागरांना संजीवनी प्राप्त होऊन मीठ पिकवण्याचा व्यवसाय पुन्हा सुरू होऊ शकतो, असे मत तिसवाडी जिल्ह्यातील भाटी गावातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
भाटी गावात स्थानिकांच्या गेल्या अनेक पिढ्या मीठागराचा व्यवसाय करतात. मात्र चालू पिढी ही मीठ काढणाऱ्यांची शेवटची पिढी आहे. सध्या कामगारांच्या मजुरीचा खर्च आवाक्याबाहेरचा असून आगाराच्या फळ्याही पुरल्या गेल्या आहेत. त्यामुळे अनेकांनी मीठ व्यावसाय बंद केला आहे. त्यांना पुन्हा या व्यवसायात येण्यासाठी सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे. मिठाचा व्यावसाय हा तीन महिन्यांपुरताच असतो. एप्रिल ते मे महिन्यात पाऊस पडला तर उत्पन्न वाया जात असते अशी माहिती येथील काही व्यावसायिकांनी दिली.