गोव्यातील बाळ्ळी गावातील
भरवस्तीत ब्लॅक पँथर जेरबंद

मडगाव – गोव्यातील मडगाव तालुक्यातील बाळ्ळी गावातील लोकवस्तीत आलेला ब्लॅक पँथर शनिवारी पहाटे वन खात्याने लावलेल्या पिंजर्‍यात अडकला.गेल्या काही दिवसांपासुन वनखाते या ब्लॅक पँथरला पकडण्यासाठी पाळत ठेवून होते.अखेर तो जाळ्यात सापडला.

हा ब्लॅक पँथर आपल्या भक्ष्य पकडण्यासाठी पिंजर्‍याजवळ आला होता. तो पिंजर्‍यात शिरला आणि पिंजर्‍याचे दार बंद झाले.हा ब्लॅक पँथर दीड ते दोन वर्षांचा असून मादी जातीचा आहे. त्याला पकडण्यासाठी मंत्री विश्वजीत राणे यांनी व्यक्तिगत लक्ष घातले होते. १५ मार्चपासून ब्लॅक पँथर रोज पिंजर्‍याजवळ येत होता आणि फिरून माघारी जात होता. या भागातील कुत्रे आणि मांजरे पकडून लोकांमध्ये त्याने दहशत निर्माण केली होती. मात्र अखेर तो जाळ्यात सापडलाच.

Scroll to Top