पणजी- उत्तर गोवा जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या डिचोली
शहरावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे.कालपासून खासदार सदानंद तानवडे , माजी खासदार विनय तेंडुलकर आणि आमदार डॉ.चंद्रकात शेट्टे व नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्या हस्ते उद्घाटन करून हे कॅमेरे प्रत्यक्ष सुरू करण्यात आले आहेत.
शहरातील वाढत्या चोर्या आणि गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे अशी मागणी शहरातील नागरिक गेल्या काही वर्षांपासून करत होते. त्यामुळे माजी खासदार विनय तेंडुलकर यांनी गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात शहरात ३७ कॅमेरे लावण्यासाठी ९२ लाख रुपये मंजूर केले होते. त्यानुसार संपूर्ण शहरात मोक्याच्या ठिकाणी आणि मुख्य बाजारात हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.हे कॅमेरे सुमारे ४ किलोमीटरपर्यंत झूम करून छायाचित्र टिपणार आहे.