पणजी- भारतातील सर्वांत उंच समजल्या जाणार्या धबधब्यांपैकी एक असलेल्या दक्षिण गोवा जिल्ह्यातील दूधसागर धबधब्यावर येणार्या पर्यटकांचे गाईड ट्रेकिंग शुल्कवरून आक्रमक झाले आहेत.ट्रेकिंगसाठी लागू केलेले शुल्क रद्द केल्याशिवाय पर्यटकांना सेवा देणार नाही असा निर्णय कुळे येथील गाईडनी घेतला आहे. या गाईडनी स्थानिक पंचायत,पोलीस, वनखाते आणि स्थानिक आमदारांनी चर्चेसाठी बैठक घेण्याची मागणी केली आहे.
गोवा पर्यटन विकास मंडळाने ट्रेकिंगसाठी जाणार्या पर्यटकांसाठी १७७ रुपये शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. वन खात्यानेही प्रवेश शुल्कात ५० रूपयांची वाढ केली आहे.एवढे करूनही गोवा पर्यटन विकास मंडळाने या धबधब्याजवळ काहीच सुविधा उपलब्ध केलेल्या नाहीत. त्यामुळे हे दोन्ही शुल्क रद्द केले जात नाही तोपर्यंत पर्यटकांना ट्रेकिंगसाठी घेऊन जाणार नाही असा निर्णय कुळे येथील गाईडनी घेतला आहे.
गोव्यातील गाईड आक्रमक! पर्यटकांना सेवा देण्यास नकार
