पणजी – गेल्या काही वर्षांपासून गोव्यात येणार्या पर्यटकांच्या आकर्षणाचा एक केंद्रबिंदू बनलेल्या नेत्रावळी अभयारण्यातील काही भागाची दुरवस्था झाली आहे.याठिकाणी असलेले श्री गोपीनाथ मंदिर व देवळाच्या पायथ्याशी असलेले बुडबुड तळी व सभोवतालच्या काही भागांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे याठिकाणी येणार्या
पर्यटकांमध्ये नाराजी दिसत आहे.
विद्यमान समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी २०१२ साली आमदार असताना सांगे तालुक्यातील नेत्रावळी अभयारण्यातील या भागाचे सुशोभीकरण केले होते. त्यानंतर हा परिसर देवस्थानच्या ताब्यात देण्यात आला.मात्र हा परिसर देवस्थानच्या ताब्यात गेल्यानंतर देवस्थानचे दुर्लक्ष झाल्याने पर्यटक दुरावला गेला आहे.बुडबुड तळीची योग्यप्रकारे निगा राखली जात नाही;असा आरोप नेत्रावळी गावचे सरपंच बुंदा वरक यांनी केला आहे.