गोवा सरकारी कार्यालयात एलईडी बल्ब बंधनकारक

पणजी – गोवा राज्यात सरकारच्या उर्जा संवर्धन कायदा २००१ अंतर्गत विजेची बचत मोहीम सुरू आहे.या मोहिमेअंतर्गत राज्यातील सरकारी कार्यालये तसेच केंद्र सरकारच्या कार्यालयांना यापुढे एलईडी बल्ब बसविणे बंधनकारक असेल. याविषयीचा आदेश मुख्य वीज अभियंत्यांनी जारी केला आहे. आदेशाचे पालन न झाल्यास संबंधित कार्यालयाच्या विजेची जोडणी तोडण्याचे अधिकार वीजखात्याला असतील, असे आदेशात नमूद केले आहे.

एलईडी बल्ब बसवण्यासह ब्रशलेस डीसी फॅन तसेच पंचतारांकीत गुणवतेची वातानुकूलन पाच स्टार रेटेड यंत्रणा बसविणे बंधनकारक आहे. पारंपरिक बल्बपेक्षा एलईडी बल्बसाठी तुलनेने वीज कमी लागते. एलईडी बल्ब बसवणे नियम औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांही लागू असेल, असे आदेशात म्हटले आहे. तसेच विजेच्या बचतीसाठी ब्रशलेस डीसी म्हणजे डायरेक्ट करंट फॅन बसविणे आवश्यक आहे.कार्यालयाचे नुतनीकरण किंवा दुरुस्ती करताना सरकारी कार्यालयानी पारंपरिक व सदोष बल्बच्या जागी एलईडी बल्ब बसवावे.तसेच औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांनी वर्षभरात स्वखर्चाने पारंपरीक व सीएफएल बल्बांच्या जागी एलईडी बल्ब बसविणे सक्तीचे असणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top