गोल्डमन सॅक्स १८०० कामगारांना कमी करणार

वॉशिंग्टन – जगातील सर्वात मोठी आर्थिक सल्लागार कंपनी आणि वित्तसंस्था गोल्डमन सॅक्स मोठी कामगार कपात करणार आहे.कंपनीने ३ ते ४ टक्के कामगार कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १३०० ते १८०० कामगारांना कामावरून कमी करण्याची शक्यता आहे.

गोल्डमन सॅक्सचे प्रवक्ते टोनी फ्रॅटो यांनी सांगितले की , ही दरवर्षी केली जाणारी सामान्य प्रक्रिया आहे.कर्मचारी कपात जरी केली तरीही डिसेंबर २०२४ अखेरीस कर्मचाऱ्यांची संख्या २०२३ पेक्षा जास्त असणार आहे. ही कामगार कपात नवीन नाही. दरवर्षी कंपनी २-७ टक्के कामगार कपात करते. कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या कंपनीची आर्थिक स्थिती आणि बाजारातील परिस्थिती यावर अवलंबून असते

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top