पुणे – गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडेंच्या पदासाठीच्या पात्र-अपात्रतेचा मुद्दा गाजत होता. त्यावरून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन रानडे यांना पुन्हा त्यांचे पद विद्यापीठाने बहाल केले . त्यानंतर आता रानडेंनी कुलगुरूपदाचा राजीनामा दिला आहे . गोखले संस्थेचे कुलपती डॉ. संजीव सन्याल यांना त्यांनी राजीनाम्याचे पत्र दिले.गोखले संस्थेच्या कुलगुरूपदी रानडे यांची नेमणूक केल्यावरून वाद निर्माण झाला होता. रानडे यांच्याकडे या पदासाठी आवश्यक पात्रता नसल्याचा आक्षेप घेऊन तक्रारी करण्यात आल्या. तत्कालीन कुलपती डॉ. बिबेक देबराय यांनी सत्यशोधन समिती नियुक्त करून समितीच्या शिफारसीनुसार रानडे यांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाला रानडे यांनी न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने डॉ. देबराय यांच्या निर्णयाला स्थगिती देत रानडे यांना दिलासा दिला. मात्र अंतिम निर्णय आलेला नाही . त्यानंतर डॉ. देबराय यांनी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. संजीव सन्याल यांची कुलपतीपदी नियुक्ती मागे घेऊन पुन्हा रानडे यांची नियुक्ती केली . त्यांनी रानडे यांच्यावरील कारवाईचे पत्र मागे घेत असल्याचे न्यायालयाला कळवले. त्यानंतर या वादावर पडदा पडला होता. या पार्श्वभूमीवर रानडे यांनी डॉ. सन्याल यांना राजीनाम्याचे पत्र सादर केले. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |