गोंदिया – गोंदिया जवळील खमारी गावात एका घरात घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. सिलेंडरचा स्फोट झाल्याने घराला आग लागली. स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलाला आगीची माहिती दिली. आगीची माहिती मिळताच नगर परिषदेचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. काही वेळात अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घरातील जवळपास ३ लाख रुपयांचे साहित्य यात जळून खाक झाले. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
गोंदियाच्या खमारी येथे गॅस सिलेंडरचा स्फोट
