नाशिक – गृहमंत्री अमित शहा उद्या नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यानिमित्त ते त्र्यंबकराजाचे दर्शन, पूजन करणार आहेत. तालुक्यातील अजंग गावातील वेंकटेश्वरा को-ऑपरेटिव्ह फर्मला भेट देणार आहेत. याठिकाणी सहकार परिषद आयोजित केली आहे. त्यानंतर ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
अमित शह यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून प्रशासनाने नाशिक जिल्ह्यात नो फ्लाय झोनचे आदेश दिले आहेत. कोणत्याही प्रकारचे ड्रोन, पॅराग्लाइडर्स, पॅरा मोटर्स, हॉट एअर बलून, मायक्रोलाईट एअरक्राफ्ट परवानगी शिवाय उडवण्यास मनाईचे आदेश दिले आहेत.
गृहमंत्री अमित शहा आज नाशिक दौऱ्यावर
