कोल्हापूर- कोरोनाकाळापासून अनेकजण गुळाचा चहा पिणे पसंत करू लागले आहेत. छोट्या टपर्या आणि स्टॉलवर गुळाच्या चहाची ऑर्डर देणारे गिर्हाईक वाढले आहेत. त्यामुळे गुळाची विक्री वाढून गुळाचे भावही वधारले आहेत.आता हा भाव वाढून ६५ रुपयांवर पोहचला आहे.
गेल्या महिन्यात ५५ रुपये किलो दराने गूळ विकला जात होता.पण आता गुळाचे भाव दहा रुपयांनी वाढून ६५ रुपये किलो झाले आहेत. हिवाळ्यात वारंवार ताप येत असेल तर सुंठ आणि गुळाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.तोंडातून दुर्गंधी येत असेल तर गुळ आणि बडीशेप एकत्र करून खायला सांगितले जाते.हिवाळ्याच्या हंगामात निरोगी राहण्यासाठी गुळाच्या लाडूच्या सेवन केले जाते. शिवाय गुळाचा चहा पिणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने खास करून कोल्हापुरी गुळाला मागणी वाढली आहे.