आग्रा – शैक्षणिक संस्थांच्या भोंगळ कारभार यापूर्वी अनेक वेळा चव्हाट्यावर आला आहे. पेपर फुटीपासून ते बोगस पदव्यापर्यंत अनेक घोटाळ्यांनी शैक्षणिक क्षेत्र बदनाम झालेले आहे. मात्र त्याचा विध्यार्थ्यांना कसा आणि किती त्रास सहन करावा लागतो याचे एक संतापजनक उदाहरण समोर आले आहे.आग्र्यातील डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठात आशिष प्रिन्स हा विद्यार्थी योग या विषयात एमए करीत आहे. त्याने परीक्षा दिली, पण त्याला गुणपत्रिकाच देण्यात आली नाही. अनेकदा तक्रार करुनही. चकरा मारूनही काहीच उपयोग होत नसल्याने त्याने थेट प्रभू श्रीरामाला पत्र लिहिले. ‘हे देवा, मी आपल्याकडे प्रार्थना करतो की, माझी गुणपत्रिका मला मिळवून द्यावी.’ अशी विनंती त्याने पत्रात केली आहे. त्याने पोस्टाद्वारे हे पत्र प्रभू श्रीरामाला पाठवले आहे. हे पत्र सोशल मिडीयामध्ये चांगलेच व्हायरल झाले आहे.
गुणपत्रिकेसाठी विद्यार्थ्याचे प्रभू रामचंद्राना पत्र
