मुंबई – गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचे चिरंजीव अनुज यांना ब्रेन स्ट्रोक (पक्षाघाताचा झटका) आल्यानंतर अहमदाबादच्या केडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज त्यांना पुढील उपचारासाठी एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईला हलवण्यात आले आहे. मुंबईच्या ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांच्यावर पुढील उपचार केले जाणार आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. दरम्यान मुलाला ब्रेनस्ट्रोक झाल्याने मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आपले दिवसभराचे सर्व कार्यक्रम रद्द केले. रविवारी दुपारी जेवल्यानंतर अनुज पटेल यांना ब्रेनस्ट्रोक आला. त्यानंतर त्यांना तत्काळ अहमदाबादच्या केडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर एक सर्जरी करण्यात आली. त्यानंतर त्यांना ब्रीच कँडीमध्ये आणण्यात आले.
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाला पक्षाघाताचा झटका! मुंबईत उपचार सुरू
