कच्छ – गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात आज सकाळी १०.२४मिनिटांनी ३.२ रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला.या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाली.गांधीनगर स्थित इन्स्टिट्यूट ऑफ अर्थक्वेक रिसर्चनुसार भूकंप सकाळी १०.२४ वाजता झाला.त्याचे केंद्र भचौच्या उत्तर-ईशान्येस २३ किलोमीटर अंतरावर होते.गेल्या महिन्यात कच्छमध्ये ३ पेक्षा जास्त तीव्रतेच्या ४ भूकंपाच्या हालचालींची नोंद करण्यात आली होती.ज्यामध्ये ३ दिवसांपूर्वी ३.२ तीव्रतेचा भूकंप होता.ज्याचा केंद्रबिंदू भचौजवळही होता.कच्छ जिल्ह्यात २३ डिसेंबरला ३.७ रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला होता. तर ७ डिसेंबरला ३.२ रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला होता.१८ नोव्हेंबर रोजी कच्छमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप झाला होता. यापूर्वी १५ नोव्हेंबर रोजी उत्तर गुजरातमधील पाटणमध्ये ४.२ तिव्रतेचा भूकंप झाला होता.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |