नंदुरबार- गुजरात राज्यातून जेरबंद केलेले बिबटे महाराष्ट्राच्या हद्दीत सोडण्याचा गुजरात वनविभागाचा डाव फसला आहे.
गुजरातच्या हद्दीतून पकडण्यात आलेले बिबटे महाराष्ट्राच्या नंदूरबार जिल्ह्यातील हद्दीत सोडण्याचा प्रयत्न सुरू होता.हे बिबटे नर्मदा नदीतून बार्जद्वारे नंदुरबार जिल्ह्याच्या हद्दीत सोडण्यात येणार होते.मात्र नर्मदा काठावरील मनिबेली, चीमलखेडी गावातील आदिवासी बांधवांच्या तीव्र विरोधानंतर गुजरातमधील वन अधिकाऱ्यांना घटनास्थळावरून काढता पाय घ्यावा लागला.नर्मदा काठावर गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचा आरोप येथील स्थानिक लोकांकडून करण्यात आला आहे. गुजरातमध्ये काम करणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा प्रकार बंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा येथील ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.