पुणे – गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस)मुळे राज्यातील पहिल्या बळीची पुण्यात नोंद झाली.तो मूळचा सोलापूरचा होता.तो पुण्यात एका खासगी कंपनीत सीए म्हणून नोकरी करत होता. तो डीएसके विश्व धायरी परिसरात राहत होता. या तरुणाला काही दिवसांपूर्वी गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजाराची लागण झाली होती. जीबीएसमुळे तब्येत खालावल्याने त्याला सोलापूरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. मागील पाच दिवसांपासून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती स्थिर झाल्यावर शनिवारी त्याला अतिदक्षता विभागातून बाहेर हलवले होते. मात्र, त्यानंतर काही वेळातच त्याला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
दरम्यान मागील आठवडाभरात जीबीएस रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली आहे. त्यापैकी १६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,या आजाराने बाधित रुग्णावर पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत. याविषयी महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी घाबरू नये आणि काळजी घ्यावी.
गुइलेन बॅरे सिंड्रोमचा राज्यात पहिला बळी
