गायक लिअम पेन याचे अर्जेटिनात अपघाती निधन

ब्युनॉस – आयर्सआपल्या वन डिरेक्शन या गीतामुळे जगभरात पोहोचलेला गायक व कलाकार लिअम पेन याचे अर्जेटिनामधील एका हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. तो ड्रग व दारुच्या अंमलाखाली असल्याने हा अपघात झाल्याची शक्यता अर्जेंटिनाच्या पोलिसांनी व्यक्त केली आहे. मृत्यूच्या काही वेळापूर्वीचा त्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे.३१ वर्षांचा लिअम पेन हा जागतिक दर्जाचा ब्रिटिश गायक होता. त्याचे जगभरात अनेक चाहते आहेत. त्याच्या अनेक गीतांना जगभरात गाजली आहेत. २ ऑक्टोबर रोजी त्याचा कार्यक्रम रोजी अर्जेंटिनात होता. या कार्यक्रमाला चाहत्यांनी जबरदस्त प्रतिसाद दिला होता. तेव्हापासून तो अर्जेंटिनातच होता. काल दुपारी त्याने आपल्या चाहत्यांसाठी एक व्हिडीओही बनवला होता. त्यानंतर तो तिसऱ्या मजल्यावरील आपल्या हॉटेलच्या रुममध्ये गेला व काही वेळाने तिथून खाली पडला. ब्युनॉस आयर्स पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पुढील कारवाई केली. यावेळी हॉटेलमध्ये त्याची मैत्रीणही उपस्थित असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top