नागपूर – ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांचे काल मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास नागपूर येथे निधन झाले. मोहनभाई यांचे व्यक्तित्व आणि आणि त्यांचे आयुष्य हीच एक मोठी चळवळ किंवा संस्था होती. गांधी-विनोबांच्या विचारातील ‘ग्रामस्वराज्य’ ही त्यांच्या कामाची दिशा होती. गडचिरोली जिल्ह्यातील लेखा-मेंढा गावातील ‘मावा नाटे मावा राज’ या चळवळीचे ते एक आधारस्तंभ होते. गांधी-विनोबांचे परिवर्तनाचे सिद्धांत केवळ प्रयोगात्मक नव्हते तर ते कसे व्यवहार्य असू शकतात, हे त्यांनी लेखा-मेंढाच्या चळवळीतून सिद्ध केले होते. त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वनहक्क-बांबू संवर्धन व कौशल्य विकास क्षेत्रात भरीव कामगिरी केली होती.
तसेच, चंद्रपूरसह विदर्भ व राज्यात सामूहिक वनहक्क चळवळ गतिमान करत गावाला स्वयंपूर्ण करणाऱ्या निरलस सामाजिक कार्यकर्त्यांच्या पिढीपैकी मोहन हिराबाई हिरालाल हे एक होते. ते मूळचे चंद्रपूरचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
गांधीवादी कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांचे निधन
