Home / News / गांधीनगर जंक्शनवर बेस्ट बसला भीषण आग

गांधीनगर जंक्शनवर बेस्ट बसला भीषण आग

मुंबई – जेव्हीएलआरच्या गांधीनगर जंक्शनवर बेस्टच्या ३०३ बसला भीषण आग लागली. ही घटना आज दुपारी १.३० वाजता घडली. चालकाच्या प्रसंगावधानमुळे...

By: E-Paper Navakal

मुंबई – जेव्हीएलआरच्या गांधीनगर जंक्शनवर बेस्टच्या ३०३ बसला भीषण आग लागली. ही घटना आज दुपारी १.३० वाजता घडली. चालकाच्या प्रसंगावधानमुळे बसमधील प्रवाशांचा जीव वाचला.ही बस पवई येथून एलबीएस मार्गाने विक्रोळीच्या दिशेने निघाली होती. बसमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने तात्काळ बस थांबवली. त्यानंतर लगेच बसमधील प्रवाशांना गाडीतून खाली उतरवले. त्यानंतर काहीच क्षणात बसने पेट घेतला. ही बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या घटनेमुळे रस्त्यावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचताच ही आग विझवली.

Web Title:
संबंधित बातम्या