कॅलिफोर्निया
ॲपल कंपनीने नवी उत्पादने लाँच केली. यात आयफोन १५ चे ४ आणि स्मार्ट वॉचचे २ मॉडेल लाँच करण्यात आले. यामधील आयफोन १५ प्रो आणि १५ प्रो मॅक्समध्ये कॉल सुरु असताना आजूबाजूच्या गोंधळाचा आवाज बंद (नॉइज कॅन्सलेशन) करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे कितीही गोंगाट असला तरीही कॉलवर तो ऐकू येणार नाही. तसेच यात मशीन लर्निंगद्वारे ऑटोमॅटिक पोर्टेट फोटो काढण्याचे तंत्रज्ञानही देण्यात आले आहे.
या नव्या फोनमध्ये एअरपॉड्ससाठी यूएसबी-सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे एकाच चार्जरने सर्व उपकरणे चार्ज करता येणार आहेत. या फोनमध्ये रोड साइड असिस्टंटची सुविधा उपग्रहाद्वारे मिळू शकेल. शिवाय या फोनचे ॲक्शन बटण खास बनवून घेण्यात आले आहे. आयफोन १५ ७९,९०० रुपये, आयफोन १५ प्लस ८९,९००रुपये, आयफोन १५ प्रो १,३४,९०० रुपये तर, आयफोन १५ प्रो मॅक्स १, ५९,९०० रुपयांना मिळणार आहे.