कणकवली – कणकवली रेल्वे प्रशासनातर्फे गणेशभक्तांसाठी ३१ जुलै रोजी आणखी पाच विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा करण्यात आली होती. या गाड्या रत्नागिरी स्थानकापर्यंत धावणार आहेत. या गाड्यांसाठी आरक्षण प्रक्रिया ७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तिकीट आरक्षण प्रक्रिया इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवर सुरू होणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)-रत्नागिरी-एलटीटी द्विसाप्ताहिक, पुणे-रत्नागिरी-पुणे साप्ताहिक, रत्नागिरी- पनवेल-रत्नागिरी साप्ताहिक, पुणे- रत्नागिरी-पुणे साप्ताहिक, रत्नागिरी-पनवेल- रत्नागिरी साप्ताहिक या पाच गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे.