नागपूर – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरणातील आरोपी जयेश पुजारी उर्फ शाकीरच्या पोलीस चौकशीत काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.जयेश पुजारीने काही वर्षांपूर्वी धर्मपरिवर्तन केले होते. त्यानंतर त्याचा नाव शाकीर ठेवण्यात आला आहे. पोलीस चौकशीत जयेश नाव उच्चारताच तो माझे नाव शाकीर असल्याचे सांगितले. जयेशला तुरुंगात स्मार्ट फोनच्या माध्यमातून आपल्या पत्नी व इतर महिला मित्रांशी सतत व्हिडिओ कॉलद्वारे संपर्कात होता. तुरुंगात त्याला मागेल तेव्हा मांसाहार आणि इतर सोयी उपलब्ध होत्या. लवकरच या प्रकरणाचे तपास लवकरच केंद्रीय तपास यंत्रणांकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.