कोल्हापूर- गगनबावडा तालुक्यातील भुईघाट परिसरात बालरोगतज्ज्ञ डॉ. अमित पाटील यांना पाण्यात एक दुर्मिळ साप आढळून आला आहे. हा साप अतिशय शांत स्वभावाचा असून ‘रॅबडॉप्स अॅक्वाटिका’ असे त्यांचे असून त्याचे मराठीत अद्याप नामकरण झालेले नाही.
या सापाचे प्रोफाईल फोटो घेऊन ते डॉ.अमित पाटील यांनी विख्यात सरिसृपतज्ज्ञ वरद गिरी यांना पाठवले असता त्यांनीच या सापाचे नाव ‘रॅबडॉप्स अॅक्वाटिका’ असे असल्याचे सांगितले. या सापाचा अलीकडेच म्हणजे २०१७ साली शोध लागला आहे.या सापाच्या पाठीचा रंग गडद शेवाळी तपकिरी तर पोटाकडील रंग फिक्कट पिवळा असतो. त्यांच्या शरीरावर काळे ठिपके असतात.तो शक्यतो धबधब्याच्या परिसरातील उथळ आणि संथ वाहणार्या पाण्यात राहणे पसंत करतो. हा साप बिनविषारी आहे.