गगनचुंबी इमारतींच्या शहरांच्या यादीत मुंबई १५ व्या क्रमांकावर

मुंबई- गगनचुंबी इमारती असणार्‍या देशाच्या यादीत भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर १५ व्या क्रमांकावर आहे. या यादीत चीन पहिल्या क्रमांकावर असून टॉप टेन यादीत चीनच्या तब्बल सहा शहरांचा समावेश आहे.

जगभरातील १५०मीटरपेक्षा उंच इमारती असलेल्या शहरांमध्ये चीनचा दबदबा आहे. टॉप १० शहरांमध्ये चीनमधील सहा शहरे आहेत.चीनमध्ये ३०० मीटर उंचीच्या ५७ इमारती आहेत. तर भारतात ३०० मीटरपेक्षा उंच अशी एकच इमारत आहे. उंच इमारतींच्या देशांच्या यादीत चीनचे शेनजेन दुसर्‍या क्रमांकावर असून या शहरात ४१४ इमारती आहेत. या यादीत न्यूयॉर्क तिसऱ्या नंबरवर असून ३१८ उंच इमारती आहेत. चौथ्या क्रमांकावर दुबई शहर आहे. दुबईमधील बुर्ज खलिफा ही इमारत ८२८ मीटर उंच आहे.
मुंबई शहर या यादीत १५ व्या स्थानावर आहे. मुंबईत १०२ इमारतींची उंची १५० मीटरहून अधिक आहे. टॉप १०० शहरांच्या यादीत मुंबई हे भारतातील एकमेव शहर आहे. तर चीनचा भूभाग असलेल्या हाँगकाँगमध्ये अशा ५५८ इमारती आहेत,ज्यांची उंची १५० मीटरहून अधिक आहे. १९८० च्या आधी या शहरात अशा फक्त दोन इमारती होत्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top