मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात ८ दिवस सभा होणार आहेत. २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघांसाठी मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या ७ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात असणार आहे. या काळात ते महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात सभा घेणार आहेत. मोदी या सभा फक्त भाजपच नाही तर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही घेणार आहेत. ते १४ नोव्हेंबरपासून विदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात सभा घेण्यासाठी कमी कालावधी मिळणार आहे. मात्र या कालावधीतही जास्तीत जास्त सभा कशा घेतल्या जातील, याकडे महायुतीचा कल असणार आहे.