खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी
घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट

नवी दिल्ली- ठाकरे गटाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी आज गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तक्रार करत त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना झालेली मारहाण तसेच संभाजीनगर येथे झालेली दंगल या पार्श्वभूमीवर चतुर्वेदी यांनी ही भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. \’महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात भेट घेतल्याचे सांगताना, महाराष्ट्रातील संस्कार, संस्कृती कधीही महिलांबरोबरच्या अशा मारहाणीचे प्रकार सहन करणार नाही. मी या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी शहा यांच्याकडे केल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे गृहमंत्री अपयशी ठरले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना फटकारले. छत्रपती संभाजीनगर दंगलीत कशी हिंसा झाली हे सर्वांनी पाहिले. आता रोशनी शिंदेंना मारहाण झाली याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याऐवजी पोलीस पीडित महिलेच्या मागे लागले आहेत. हा कोणता न्याय आहे,\’\’असा सवाल चतुर्वेदी यांनी शाह यांच्यासमोर उपस्थिती केला आहे. त्यांनतर आता आम्ही दोषींवर कारवाई करू. याबाबत त्यांनी आश्वासन दिले असल्याचे चतुर्वेदी यांनी सांगितले. कोणत्याही राजकीय दबावाखाली पोलिसांनी काम करू नये. रोशनी मारहाण प्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. पण महाराष्ट्राचे गृहमंत्री प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत,असा आरोपही त्यांनी यावेळी केला. महाराष्ट्राचे गृहमंत्री अपयशी ठरले आहेत, असा हल्लाबोल चतुर्वेदी यांनी केला.

Scroll to Top