Home / News / खासदार पप्पू यादव यांना बिश्नोईच्या नावाने पुन्हा धमकी

खासदार पप्पू यादव यांना बिश्नोईच्या नावाने पुन्हा धमकी

पूर्णिया- बिहारच्या पूर्णिया येथील खासदार पप्पू यादव यांना बिश्नोई टोळीच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर त्यांची...

By: E-Paper Navakal

पूर्णिया- बिहारच्या पूर्णिया येथील खासदार पप्पू यादव यांना बिश्नोई टोळीच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
खासदार यादव यांना पाकिस्तानातून धमकीचा एक ऑडिओ व्हॉट्सअप संदेश आला असून त्यात पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. या ऑडिओ संदेशात म्हटले आहे की, आमची तयारी पूर्ण झाली आहे. आमचे सहकारी तुमच्या अगदी जवळ पोहोचले असून तुमचे रक्षकही आता तुम्हाला वाचवू शकणार नाहीत. तुमचे शेवटचे दिवस आनंदात जाओ. या धमकीनंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या आधीही पप्पू यादव यांना अशा प्रकारच्या धमक्यांचे फोन आले होते. या धमक्यांमुळे पप्पू यादव यांच्या एका मित्राने त्यांना अडीच कोटी रुपयांची बुलेट प्रुफ कार भेट दिली होती. त्या मित्रालाही धमकीचा फोन आला होता.

Web Title:
संबंधित बातम्या