खार, वांद्रे परिसरातशुक्रवारी पाणीपुरवठा बंदमुंबई – खार आणि वांद्रे पश्चिम येथे येथील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी केले जाणार आहे. त्यासाठी या दोन्ही विभागातील नागरिकांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
पाली हिल जलाशय १ आणि वांद्रे पूर्व येथील आर. के. पाटकर मार्गावरील जलवाहिनीचे काम शुक्रवारी सकाळी १० ते रात्री १२ पर्यंत केले जाणार आहे. या कालावधीत खार दांडा कोळीवाडा, गझदरबंध झोपडपट्टी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग लगतचा परिसर, खार पश्चिमेचा काही भाग, वांद्रे हिल रोड, मॅन्युअल गोन्सालविस मार्ग, पाली गावठाण आदी परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा. पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे. पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ४ ते ५ दिवस पाणी गाळून आणि उकळून वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.