मंबई – खारघर दुर्घटना प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील नितीन सातपुते यांनी दाखल केलेल्या या याचिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र भूषण सोहळ्यासाठी खर्च केलेले १४ कोटी रुपये आयोजकांकडून वसूल करण्याचीही मागणी याचिकेत करण्यात आली आहे. राजकीय फायद्यासाठी १० लाख लोकांना कार्यक्रमासाठी बोलावण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आलाय. व्हीआयपी पाहुणे एसीमध्ये जेवले, तर लोकांना मरण्यासाठी सोडून दिले, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
खारघर प्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
