मुंबई – मध्य रेल्वेच्या अकोला-रतलाम विभागातील गेज परिवर्तन आणि खांडवा यार्ड नुतनीकरणासाठी रिमॉडेलिंगचे काम करण्यात येणार आहे.या कामामुळे १४ जुलै ते २४ जुलैपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे एकमेकांना जोडली जाणार आहे. या कामामुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
या १० दिवसांच्या ब्लॉकच्या कालावधीत बिहार, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशातून मुंबईकडे येणार्या डझनभर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये १४ जुलै रोजी रिवा सीएसएमटी एक्स्प्रेस, पाटणा-सीएसएमटी, दादर-गोरखपुर,१५ जुलै रोजी सीएसएमटी- रिवा, मुंबई सेंट्रल-भुसावळ, भुसावळ-मुंबई सेंट्रल, रक्सौल-एलटीटी, दादर-बलिया, जबलपूर-सीएसएमटी, १६ जुलै रोजी सीएसएमटी-पाटणा, दादर-गोरखपूर, सीएसएमटी-जबलपूर, गोरखपूर-दादर, १७ जुलै रोजी एलटीटी-रक्सौल, बलिया-दादर, मुंबई सेंट्रल-भुसावळ, भुसावळ-मुंबई सेंट्रल, पाटणा-सीएसएमटी, दादर-बलिया,जबलपूर- सीएसएमटी, १८ जुलै रोजी दादर-गोरखपूर, सीएसएमटी-जबलपूर, गोरखपूर-दादर, १९ जुलै रोजी सीएसएमटी-पाटणा, एलटीटी- गोरखपूर, दादर-बलिया, बलिया-दादर, २० जुलै रोजी मुंबई सेंट्रल-भुसावळ, भुसावळ- मुंबई सेंट्रल, दादर-गोरखपूर, जबलपूर- सीएसएमटी, गोरखपूर-दादर, २१, २२, २३ आणि २४ जुलै रोजीही रेल्वेगाड्या रद्द करण्यात येणार आहे.