चंदीगड – ऑपरेशन ब्लू स्टारच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त सुवर्ण मंदिरात श्री अकाल तख्त साहिब येथे चालू असलेल्या अखंडपाठाचा भोग चढवण्यात आला. अकाल तख्तचे जत्थेदार ग्यानी हरप्रीत सिंग कौम यांच्या नावे संदेश देत त्यांनी सर्व शीखांना एकत्र येण्याचा सल्ला दिला. यावेळी खलिस्तान समर्थकांनी ‘खलिस्तान ले कर रहेंगे’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.
‘जर सर्व शीख एकत्र आले तर ते येथे आणून सरकारला नमवू शकतात. १९८४ चा वृत्तांत आपल्याला अधिक मजबूत करतो. आपल्याला १९८४ ची जितकी जास्त आठवण येते तितके आपण अधिक मजबूत होतो. त्याचबरोबर ब्लू स्टार ऑपरेशनमध्ये मारल्या गेलेल्या शीखांच्या कुटुंबीयांचाही सन्मान करण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळपासूनच शीख भाविक जमा होऊ लागले. १९८४ मधील ब्लू स्टार ऑपरेशनची छायाचित्रे काहींच्या हातात होती, तर काहींनी शांततेने खलिस्तानच्या मागणीचे पोस्टर हातात घेतले होते. ब्लू स्टार ऑपरेशनला विरोध करणाऱ्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही पोलिसांनी केले’, असे जत्थेदार ग्यानी हरप्रीत सिंह म्हणाले. दरम्यान, सुवर्ण मंदिराबाहेर पोलीस, कमांडो आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले होते. त्याचबरोबर सुवर्ण मंदिराच्या आतही साध्या वेशात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.