कीव- रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन मृत्युमुखी पडले आहेत. एवढेच नव्हे, तर गेल्या वर्षभरापासून हुबेहुब त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा (लूक अलाइक) रशियाचे अध्यक्ष म्हणून वापर केला जात आहे, असा दावा युक्रेनच्या लष्करी गुप्तहेर विभागाचे प्रमुख किरिलो बुडानोव्ह यांनी एका मुलाखतीदरम्यान केला आहे. ‘ पुतिन यांची प्रकृती अस्वस्थ आहे. त्यामुळेच ते जिवंत आहेत अशी मला खात्री नाही. ज्या पुतिनना आपण सर्व ओळखतो, त्यांना २६ जून २०२२ मध्ये शेवटचे पाहिले होते’, असे म्हणत बुडानोव्ह यांनी रशियावर टीका केली आहे. मात्र, त्यांनी आपल्या ह्या दाव्यासाठी कोणताही पुरावा अजून सादर करण्यात केलेला नाही.
खरे पुतिन हयातच नाहीत! सध्या ‘हमशकल’चा वापर
