कोल्हापूर – कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी माजी खासदार संजय मंडलिक यांचे बॅनर लागले आहेत.’जिल्ह्यातील महायुतीच्या विजयाचे शिल्पकार’, ‘खरे दादा’, ‘किंगमेकर’ असा मजकूर या बॅनरवर आहे. आहे. तसेच विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या जिल्ह्यातील दहाही मतदारसंघांत महायुतीच्या दहाही नवीन आमदारांचे फोटो आहेत. तसेच चंदगडचे अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांचा फोटोदेखील लावण्यात आला आहे. हे बॅनर मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांनी लावले असून त्यातून त्यांचे जिल्ह्यातील महत्त्व अधोरेखीत करण्यात आले आहे.
खरे दादा, किंगमेकर! संजय मंडलिकांचे लागले बॅनर
