श्रीनगर – जम्मू काश्मीर खोऱ्यातील खराब हवामान, पाऊस व धोकादायक रस्त्यांमुळे अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. अमरनाथाला जाणारे पहलगाम व बालटाल हे दोन्ही मार्ग बंद करण्यात आल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.जम्मू काश्मीरमध्ये काही दिवसांपासून सुरु असलेला जोरदार पाऊस व खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रेच्या मार्गात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. वाटेतील ओढ्यांना आलेले पाणी व निसरडे रस्ते यामुळे अमरनाथकडे जाणारे दोन्ही मार्ग धोकादायक झाले आहेत. त्यामुळे ही यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. अमरनाथच्या दिशेने जाणारे यात्रेकरू बेसकॅम्पमध्ये अडकून पडले असून यात्रा सुरू होण्याच्या आदेशाची प्रतीक्षा करत आहेत. यात्रेचा शेवटचा दिवस १९ ऑगस्ट आहे. या वर्षी अमरनाथ यात्रा २९ जूनला सुरु झाली होती.
खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा स्थगित
