मुंबई- मुंबई शहरात ‘मंकीपॉक्स’ आजाराचा एकही रुग्ण आढळलेला नाही तरीही सरकारच्या निर्देशानुसार खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सेव्हन हिल्स रुग्णालयात मंकीपॉक्स रुग्णांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या विशेष कक्षात १४ खाटांची सोय करण्यात आली आहे.
पाकिस्तान आणि स्विडन या देशांत मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत.मुंबई शहरात परदेशातून येणार्या नागरिकांची संख्या लक्षात घेता अधिक सावधगिरी बाळगली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सेव्हन हिल्स रुग्णालयात ‘मंकीपॉक्स’ रुग्णांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याठिकाणी सध्या तरी १४ खाटांची सोय केली आहे. गरजेनुसार त्यात वाढ केली जाणार आहे. त्याचप्रमाणे यासंदर्भात मुंबई विमानतळ आरोग्य अधिकारी,इमिग्रेशन अधिकारी आणि कार्यकारी आरोग्य अधिकारी यांची एकत्रित समन्वय बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीनंतर विशेषतः आफ्रिकन देशातून येणार्या प्रवाशांची आणि इतर प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे.