खडसेंच्या अडचणीत वाढ! चौकशीसाठी एसआयटी

नाशिक:- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होणार आहे. नाशिकच्या मुक्ताईनगर येथील सातोड प्रकरणात आता एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. गौण खनिज अवैध उत्खनन प्रकरणात ४०० कोटी रुपयांचा महसूल बुडवल्याचा आरोप एकनाथ खडेंसवर करण्यात आला आहे.

या प्रकरणात एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे यांच्या नावाने सातोड शिवारात ३३ हेक्टर ४१ आर जमिनीची खरेदी करण्यात आली. या जमिनीला शालेय कारणासाठी बिनशेती परवाना म्हणजेच एनए प्रदान करताना अनियमितता झाल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात केला होता. तसेच गौण खनिज प्रकरणात अवैध उत्खनन करत तब्बल ४०० कोटी रुपयांचा महसूल बुडवल्याचा आरोपही करण्यात आला होता. नाशिक विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन केली आहे. विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना खडसे यांच्याविरोधात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.

Scroll to Top