नवी दिल्ली – महिला कुस्तीपटुंचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणीच्या खटल्याची सुनावणी वेगाने पूर्ण करावी, अशी मागणी कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण शरण सिंह यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिले.
न्या. मनोज कुमार ओहरी यांच्या एकल पीठासमोर ब्रजभूषण यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्याप्रसंगी याच एकल पीठासमोर तीन आठवड्यांपूर्वी आरोप रद्द करण्याची मागणी करणाऱ्या ब्रजभूषण यांच्या मूळ याचिकेवर सुनावणी झाली.त्याप्रसंगी न्यायालयाने पुढील सुनावणी १३ जानेवारी २०२५ रोजी ठेवल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.त्यानंतर खटला वेगाने निकाली करण्याच्या मागणीसाठी ब्रजभूषण यांनी ही दुसरी याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने ब्रजभूषण यांच्या या याचिकेची दखल घेत १६ डिसेंबर २०२४ खटल्याच्या पुढील सुनावणीपर्यंत दिल्ली पोलिसांनी याबाबत भूमिका स्पष्ट करावी,असे निर्देश दिले.









