सातारा – सातारा जिल्ह्याच्या खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी गावात भरधाव आयशर टेम्पोने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना काल रात्री उशिरा घडली. या अपघातात टेम्पोतील ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
चिकमंगळूरहून मुंबईकडे निघालेल्या ट्रकचा टायर फुटला. त्यामुळे चालकाने ट्रक महामार्गाच्या कडेला मोटे वस्तीसमोर उभा होता. टायर बदलल्यानंतर चालकाने ट्रक सुरू केला. त्यानंतर ट्रक रस्त्यावर नेत असतानाच आयशर टेम्पोने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघतातात टेम्पोचा मालक, चालक आणि क्लीनरचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, आयशर टेम्पोचा चक्काचूर झाला. या अपघातानंतर पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शिरवळ रेस्क्यू टीमला मदतीसाठी पाचारण केले. त्यानंतर क्रेन आणि जेसीबी आणून ट्रक आणि टेम्पो रस्त्यावरून बाजूला काढला.
खंडाळ्यात अपघात तीन जणांचा मृत्यू
