हैदराबाद – टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची तेलंगणात पोलीस उपअधीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्याने काल तेलंगणाचे पोलिस महासंचालक (डीजीपी) जितेंद्र आणि इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे डीएसपी पदाचा म्हणून पदभार स्वीकारला..
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी जुलैमध्ये सिराजला निवासी भूखंड आणि सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली होती. भारताने टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकल्यानंतर सिराजने मुख्यमंत्री रेड्डी यांची भेट घेतली होती. त्यावेळी रेवंत रेड्डी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सिराजचे अभिनंदन केले होते.
श्रेणी-१ च्या नोकरीसाठी पदवीपर्यंतचे शिक्षण आवश्यक असते. सिराज १२वी उत्तीर्ण आहे.त्याला श्रेणी-१ ची नोकरी देण्यासाठी शैक्षणिक पात्रतेत सवलत दिली आहे, असे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले होते.









