मुंबई – हिंदी मालिकांमधील अभिनेता मनोज चौहान याचे वयाच्या ३५ वर्षी निधन झाले. त्याने आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या मित्राने दिली असली तरी कुटुंबियांकडून अद्याप याला दुजोरा दिलेला नाही.
मनोज चौहान यांनी स्प्लिट्सविला ५, जिंदगी डॉट कॉम, क्राईम पॅट्रोल आणि फ्रेंडस सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले होते. २०२२ मध्ये आलेल्या तेया यार हू मै या मालिकेतही तो झळकला होता. त्यानंतर तो कोणत्याही मालिकेत दिसला नव्हता. या प्रकरणी पोलिसांनीही तपास सुरू केला आहे.