सांगली
- आटपाडी तालुक्यातील कौठूळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि सांगली जिल्हा बँकेचे आटपाडी शाखेचे शाखाधिकारी सुभाष शामराव पाटील यांचा अपघाती मृत्यू झाला. आटपाडी- दिघंची रोड वरील सावित्रीदेवी इंडस्ट्रीजवळ दोन मोटारसायकलची जोरदार धडक झाली. या अपघातात सुभाष पाटील हे ठार झाले, तर दोघेजण गंभीर जखमी झाले.
कौठूळीचे उपसरपंच व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आटपाडीचे शाखाअधिकारी सुभाष पाटील हे बँकेचे कामकाज आटोपून आटपाडीहून कौठूळीकडे निघाले होते. ते सावित्रीदेवी इंडस्ट्रीजवळ त्यांच्या वस्तीकडे आले असता दिघंचीहून येणाऱ्या मोटारसायकलने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, सुभाष पाटील यांची दुचाकी शंभर फूट अंतरावर जाऊन पडली. यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली. त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले. परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या अपघातात दुसर्या मोटारसायकलवरील दोन युवक गंभीर जखमी झाले, असून त्यांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले आहे.