मुंबई – महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सध्या 4 दिवसांच्या महाराष्ट्र दौर्यावर आहेत. आज त्यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर कोश्यारी यांनी शिंदेंची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मागच्या काही दिवसांपासून घडलेल्या घडामोडी पाहता ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षाचा निकाल देत असताना तेव्हा राज्यपालांची भूमिका संशयास्पद होती असे म्हटले होते. त्यानंतर कोश्यारींच्या विरोधात प्रतिक्रियाही आल्या होत्या. या सगळ्या घडामोडी झाल्यावर भगतसिंह कोश्यारी वर्षा बंगल्यावर आल्याने आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
कोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
