मास्कसह सोशल डिस्टन्सिंगचा
डॉ.गुलेरियांकडून इशारा
नवी दिल्ली : कोरोना संसर्गानंतर आता एच-३ एन-२ इन्फ्लूएंझाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ होत आहे. एच३एन२ इन्फ्लूएंझा हा कोविडप्रमाणे पसरत आहे, याच्यापासून आपले संरक्षण करणे आवश्यक आहे. विशेषत: वृद्धांनी काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच त्यासाठी पुन्हा एकदा मास्क आणि सोशल डिस्टंसिंग पाळण्याचा इशाराही एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी याविषयी अधिक माहिती देताना दिला आहे.
एच-१ एन-१ ही अनेक वर्षांपूर्वी महामारी होती. त्या विषाणूचे आता एच-३ एन-२ मध्ये रूपांतर झाले असल्याचे एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले. मात्र या विषाणूबाबत पूर्वीची प्रतिकारशक्ती चांगली होती, नंतर ती कमी झाली. म्हणूनच जे लोक अतिसंवेदनशील आहेत त्यांना या संसर्गाची सर्वाधिक शक्यता असते, असेही ते म्हणाले. ताप, घसादुखी, अंगदुखी आणि नाकातून पाणी येणे ही त्याची लक्षणे असल्याचेच डॉ.रणदीप गुलेरिया यांनी सांगितले. हा एक प्रकारचा इन्फ्लूएंझा व्हायरस आहे.बदलत्या हवामानानुसार इन्फ्लूएन्झा वाढण्याची दाट शक्यता असते. अनेक गर्दीच्या ठिकाणी लोक मास्क घालत नाहीत. त्यामुळे दुर्लक्ष होत आहे. यामुळे, इन्फ्लूएंझा विषाणू वेगाने पसरत आहे. इन्फ्लूएंझापासून स्वतःला रोखायचे असेल, तर गर्दीच्या ठिकाणी सावध राहिले पाहिजे असा इशाराही त्यांनी दिला आहे.
कोविडच्या धर्तीवर हा झपाट्याने पसरणारा विषाणू असल्याचे डॉ.रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. याबाबत ज्येष्ठांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. तसेच वारंवार हात धुत राहणे योग्य असल्याचे सांगताना त्यांनी इन्फ्लूएंझासाठी लस देखील उपलब्ध असल्याची माहिती दिलीय आहे. यसीएमआरच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गेल्या दोन-तीन महिन्यांपासून ताप आणि सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.त्याच वेळी, इंडियन मेडिकल असोसिएशनने ताप किंवा सर्दी झाल्यास अँटिबायोटिक्स घेणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. इन्फ्लूएंझा कोणत्याही वयाच्या व्यक्तीला कधीही होऊ शकतो. परंतु यातून सर्वात मोठा धोका गर्भवती महिला, ५वर्षाखालील मुले, वृद्ध आणि कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना आहे. याशिवाय, आरोग्यसेवा कर्मचार्यांनाही इन्फ्लूएंझा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका असतो.