सावंतवाडी :
कोळी रोगामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील सुपारी बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधितांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी तळकटचे माजी सरपंच रामचंद्र सावंत यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.
याबाबत केसरकर यांना निवेदन दिले आहे. यात असे म्हटले आहे की, सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणात बागा गळती मोठ्या प्रमाणात सुरू आहे. निर्सगाच्या अनियमितपणाच्या व यावेळी पडणाऱ्या पावसाचा परिमाण होऊन बागायतदार खूपच अडचणीत आहेत. शिवाय वेगवेगळ्या प्रकारचे कीटक जन्य रोगाच्या व कोळी रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे. यामुळे सुपारी बागायतदारांचे गळतीचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी.
यापूर्वी गेल्यावर्षी अशाच प्रकारचे पंचनामे करण्यात आले. मात्र, पंचनामे झाल्याने गतवर्षीच्या बागायतदारांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना नाराजी व्यक्त केली तरी याबाबत आपण लक्ष घालून शेतकऱ्यांना सुपारीला नुकसान भरपाई मिळवून घ्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा तळकटचे माजी सरपंच रामचंद्र सावंत यांनी केली आहे.