कोळशाची खाण कोसळून झारखंडमध्ये ३ मजुरांचा मृत्यू

रांची – झारखंडमधील धनबादमध्ये बेकायदेशीर कोळसा खाण पडल्याची घटना घडली. यात तिघांचा मृत्यू झाला. या खाणीत आणखी अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. घटनास्थळी सीआयएसएफ जवानांकडून बचावकार्य सुरू आहे. भौरा ओपी परिसरातील एटी देव प्रभा आउटसोर्सिंगमध्ये बेकायदेशीर कोळसा उत्खनन सुरू असताना ही घटना घडली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मदत आणि बचावकार्यात विलंब झाल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला. प्राथमिक माहितीत ही दुर्घटना कोळसा चोरीदरम्यान घडल्याचे सांगितले जाते. खाणीतून कोळसा काढण्याचे काम सुरू असतानी खाण कोसळली. यात १२ हून अधिक मजूर ढिगाऱ्याखाली अडकले. यातील तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top